Pune
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने काल (६ मे) सुधारित पेन्शन योजना जाहीर केली,आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता वेतन सेवा निवडण्याचा पर्याय दिला आहे.
राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मध्ये सुधारणा करून जाहीर केलेल्या नवीन सुधारित निवृत्तीवेतन योजनेची (UPS) प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार, हे सविस्तर सांगितलं आहे.
सुधारित पेन्शन योजनेचा कोणाला मिळणार लाभ? जाणून घेऊया!
केंद्राची युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) आणि महाराष्ट्र सरकारने ६ मे २०२६ च्या जीआर (GR) द्वारे लागू केलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजना NPS मध्ये सुधारणा करून आणल्या आहेत. या दोन्हीमध्ये अनेक साम्य असले तरी काही तांत्रिक फरक खालीलप्रमाणे आहेत
राज्य सरकारच्या वित्त विभागाने सुधारित पेन्शन योजनेबाबत (Revised NPS) महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे मार्च २०२४ नंतर निवृत्त होणारे आणि सध्या सेवेत असलेले लाखो सरकारी कर्मचारी यांना निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळणार याबाबत अधिक स्पष्टता मिळाली आहे.
कोणाला मिळणार ५०% पेन्शन?
नवीन नियमांनुसार -
-
ज्या कर्मचाऱ्यांनी सलग २० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केली आहे, त्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.
-
याशिवाय सरकार वेळोवेळी जाहीर करणारा महागाई भत्ता (DA) देखील मिळत राहील.