Pune
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य लेखाअधिकाऱ्याने उपसूचना असल्याचे भासवून नियमबाह्य पद्धतीने ५२ कोटी रुपयांची बीले एका रात्रीत अदा केली. त्यावर नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेतल्या आहेत.
काही बीलांवर भाजपासह राष्ट्रवादीच्याही सदस्यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे या प्रकरणात पक्षीय राजकारण न करता चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप लावला पाहिजे. नगरसेवक- ठेकेदार नव्हे, लेखाधिकारी प्रवीण जैनच खरा दोषी आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
महापालिका लेखा विभागाचे मुख्य अधिकारी प्रवीण जैन यांनी उपसूचना असल्याचे सांगून ७० हून अधिक बिलांच्या बनावट उपसूचनांवर सूचक- अनुमोदक अशा स्वाक्षरी घेतल्या आहेत. सदरची बीले नियमबाह्य पद्धतीने अदा केली. प्रकरणाचा स्थायी समिती सभपती अभिषेक बारणे यांनी पर्दाफाश केला होता.
विशेष म्हणजे, महापालिका विधी व कायदा विभागाने सदर प्रकरणात ''अशा प्रकारे मुख्य सभा किंवा स्थायी समिती सभेच्या मान्यतेशिवाय बिलांची अदायगी करता येत नाही, '' असा स्पष्ट लेखी अभिप्रायसुद्धा दिला होता. त्यामुळे प्रवीण जैन यांनी चुकीच्या पद्धतीने अदा केलेली ५२ कोटी रुपयांची बिलांच्या बनावट उपसूचनांवर ठेकेदार किंवा नगरसेवक नव्हे, तर संबंधित अधिकारी दोषी आहे, यावर शिक्कामोर्तब होते.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ''स्वाक्षरी करणारे नगरसेवक भाजपाचेच आहेत.'' असा आक्षेप नोंदवला. त्याद्वारे या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी याबाबत शहानिशा केली. त्यामध्ये असे दिसून आले की, प्रवीण जैन यांनी अदा केलेल्या बिलांच्या उपसूचनांवर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्याही स्वाक्षरी आहेत. पुणे शहरातील Pune Grand Challenge Tournament 2026 (PGCT-२०२६) च्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. विशेषतः राजीव गांधी पुनवसाहत परिसरातील सांगवी-किवळे रस्ता (भक्ती शक्ती चौक ते एम्पायर इस्टेट पुल व काळेवाडी फाटा) या मार्गावरील कामांसाठी निधी उपलब्ध करणे गरजेचे आहे_ सदर कामासाठी सन २०२५-२६ च्या सुधारीत अंदाजपत्रकात एकूण 16 कोटी 33 लाख 35 हजार इतकी तरतूद करण्यात आलेली असून, त्यापैकी 4 कोटी 20 लाख इतकी अतिरिक्त (वाढ) तरतूद करण्यात आली. या उपसूचनेवर सूचक म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेविका अरुणा लंगोटे यांची स्वारक्षी आहे, तर अनुमोदक म्हणून प्रमोद कुटे यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पक्षीय राजकारण न करता, चुकीच्या कामांना विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही बारणे यांनी केले आहे.
लेखा विभागातील अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने तब्बल ५२ कोटी रुपयांची बीले अदा केली. बनावट उपसूचना तयार करुन त्यावर नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेतल्या आहेत. यामध्ये नगरसेवक किंवा ठेकेदार यांची चूक नाही, तर संबंधित प्रवीण जैन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. भविष्यात शेकडो कोटींची बिले अशाप्रकारे अदा करुन संबंधित अधिकाऱ्याने परदेशात पलायन केल्यास त्याला जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी राजकीय उद्देशाने भूमिका घेत राजकारण करुन नये, तर शहराच्या हिताच्या भूमिका घ्यावी.
- अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.