आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

‘उभा चिरून टाकीन…’ भाजप नेत्या वादात, ऑडिओ व्हायरल

नितीन देशपांडे   29   11-04-2026 14:42:17

Pune 

जुन्नर तालुक्यात भाजपच्या पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आणि जबरदस्तीने चेक घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

रोशन बिरमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांना बोलावण्यात आले. तेथे आशा बुचके यांनी पैशासाठी जबरदस्ती केल्याचा आणि पैसे दिले नाहीत तर "उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन" अशा धमकीच्या भाषेत बोलल्याचा आरोप आहे

ऑडिओमध्ये ही भाषा स्पष्ट ऐकू येत असल्याने, "लोकप्रतिनिधी की टोळीचा वसुली एजंट?" असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रोशन बिरमल यांनी सांगितले की, त्यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.