आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त बैठकीची अफवा, उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंतांना मातोश्रीवर बोलावून घेतलं

नितीन देशपांडे   15   11-04-2026 14:29:07

Pune

शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांना गळाला लावण्यासाठी सुरु असलेल्या 'ऑपरेशन टायगर'ची (Operation Tiger) सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

बुधवारी मध्यरात्री ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या आठ खासदारांची (Thackeray Camp MPs) गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ठाकरे गट आणि शिंदे गट (Shivsena Shinde Camp) या दोघांनी या वृत्ताचा इन्कार केला. ठाकरे गटाच्या खासदारांनी तातडीने प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण दिले होते. तर शिंदे गटाच्या नेत्यांनीही 'ऑपरेशन टायगर'चा इन्कार केला होता. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून हे वृत्त देणाऱ्या संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. (Maharashtra Politics news)

या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमी संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात काम केले जात असल्याची माहिती आहे. यादृष्टीने उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. कुठल्याही प्रकारे पुरावे नसताना चुकीचे वृत्त छापून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित वृत्तपत्राला नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे.

Operation Tiger: नेमकं काय घडलं होतं?

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची ही बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती होती.

ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते.

 

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.