आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पीक विमा तुमचा पीक विमा आला का, असे करा चेक

नितीन देशपांडे   138   11-04-2026 09:22:40

Pune 

Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या (PMFBY) पोर्टलवर आता क्लेमच्या रकमेचे तपशील दिसू लागले आहेत. तुम्ही जर पीक विमा अर्ज भरला असेल आणि तुमच्या जवळच्या कृषी विभागाकडून पैसे आले असल्याची माहिती देण्यात आली असेल तर तुम्ही स्वतः चेक करू शकता

तुम्ही तुमच्या पिकासाठी किती विमा भरला होता आणि तुम्हाला किती नुकसान भरपाई (Claim Amount) मिळणार आहे, हे तुम्ही अगदी काही मिनिटात तपासू शकता. यामध्ये तुम्हाला नुकसानीची टक्केवारी आणि तुम्हाला मिळणारी एकूण विम्याची रक्कम येथे पाहता येणार आहे.

पीक विम्याचे पैसे असे चेक करा

अधिकृत वेबसाइटद्वारे (Online Portal)

  • PMFBY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावरील 'Application Status' (अर्जाची स्थिती) या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा Receipt Number (पावती क्रमांक) आणि दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती आणि विम्याचे पैसे मंजूर झाले आहेत का, हे समजेल.

मोबाईल नंबर किंवा आधार कार्डद्वारे
तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार कार्डचा वापर करून देखील स्थिती तपासू शकता.
काही सेवांमध्ये लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी 'Check Beneficiary Status' अंतर्गत आधार नंबर टाकण्याची सुविधा असते.

जर तुम्हाला काही समस्या येत असेल, तर तुम्ही हेल्पलाइन नंबर 14447 किंवा 1800-103-5490 वर कॉल करू शकता.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.