भालगुडी येथील दुर्घटनेतील पीडितांना सभापती मंदाताई बाबाजी शेळकेंचा मदतीचा हात
दुर्घटनाग्रस्त ८ कुटुंबांना ₹१. लाख २५ हजाराचा महिनाभराचा किराणा वाटप
मुळशी प्रतिनिधी -: बुधवार( ता. ८) हा दिवस मुळशी तालुक्यातील भालगुडी गावातील लव्हाळवाडी ग्रामस्थांसाठी काळा दिवस ठरला. आठ घरांना लागलेली भीषण आगीने आठ कुटुंबे आज उघड्यावर आली आहेत. वर्षभरासाठी साठविलेले अन्नधान्य सह घरातील सर्व वस्तू डोळ्यासमोर जळून खाक झालेले आहे.
उभे आहेत त्या फक्त पडलेल्या भग्न भिंती.... या घटनेने वाडीत भयान शांतता पसरली आहे. कोणी कोणाला धिर द्यायचा हेच समजत नाही अशी स्थिती झालेली आहे.
या कुटुंबांनी कष्टाने उभा केलेला संसार उद्धवस्त झाला उरला होता तो फक्त काळा धूर राख आणि राख...घरगुती साहित्य व शेतीचे अवजारांचं कोळसा झाला आहे. घरातील भांडी कुंडी वितळून गेली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
याच पार्श्वभूमीवर मुळशी पंचायत समितीच्या सभापती मा. सौ. मंदाताई बाबाजी शेळके यांनी भालगुडी येथे झालेल्या घर जळीत दुर्घटनेची पाहणी करून पीडित कुटुंबांना दिलासा दिला. या दुर्घटनेत बाधित झालेल्या एकूण ८ कुटुंबांना त्यांनी महिनाभर पुरेल इतका घरगुती किराणा माल वाटप केला, या मदतीची एकूण किंमत सुमारे रुपये १,२५,००० इतकी आहे.
या प्रसंगी मा. श्री. बाबाजी शेळके यांचीही उपस्थिती होती त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून दिलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थ तसेच पीडित कुटुंबीयांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या पुनर्वसनासाठीही ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.