आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

नितीन देशपांडे   42   09-04-2026 12:10:58

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

PUNE 

पुण्यातील शुक्रवार पेठेत घरासाठी बोअरवेल खोदताना मेट्रोच्या भूमिगत बोगद्याला छिद्र पाडणाऱ्या घरमालकाला आणि कंत्राटदाराला पुणे न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सार्वजनिक सुरक्षेशी खेळ केल्याचा ठपका ठेवत सत्र न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार प्रताप जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

या निर्णयामुळे विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ही घटना 14 मार्च रोजी खडक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका जुन्या वाड्यात घडली. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाच्या अगदी वर घरमालकाने प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बोअरवेलचे काम सुरू केले. खोदकाम सुरू असताना बोअरवेलचे यंत्र थेट मेट्रोच्या बोगद्यात घुसले. यामुळे बोगद्याची सिमेंटची भिंत फुटून तिथे 6 इंच व्यासाचे छिद्र पडले. सुदैवाने, त्यावेळी तिथून मेट्रो जात नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, असा युक्तिवाद प्रमुख जिल्हा सरकारी वकील बोंबटकर यांनी केला.

महामेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनू गोरात्रा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. या एका चुकीमुळे मेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे 2.5 Lakh रुपयांचे नुकसान झाले आहे. मेट्रो मार्ग असल्याची पूर्ण कल्पना असूनही घरमालकाने निष्काळजीपणा केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.