Pune ZP : पुणे झेडपीतील सत्तेचा वाट ठरला; सभापती निवडीत मुळशीचा नंबर लागला? बारामती, इंदापूर,मावळ, पुरंदरला ठेंगा
सभापती पदासाठी हे नावे सर्वाधिक आघाडीवर
पुणे प्रतिनिधी -: जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती आज निवडले जाणार आहेत. या निवडीमध्ये कोणत्या तालुक्यांना संधी मिळणार याबाबत सर्वत्र चर्चा असतानाच सभापती पद वाटपाचा एक फार्मूला समोर आला आहे.
विषय समित्यांच्या सभापती निवडीत मंत्र्यांचे तालुके असलेले बारामती व इंदापूर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा पुरंदर हे तीन तालुके वगळले जाण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतीच पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेतला असल्याचा सांगितले जात आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दौंड तालुक्याला देण्यात आले असून, उपाध्यक्षपद आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला सोपवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना सभापती पदापासून वगळण्यात येणार आहे. तसेच, बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभा मतदारसंघ हा भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश असलेला एकच मतदारसंघ आहे. त्यामुळे हा एकच मतदारसंघ ग्राह्य धरण्यात येणार आहे.
सभापती पदासाठी हे नावे आघाडीवर
चार विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे पारडे जड झाले आहे. यामध्ये मावळ, मुळशी, जुन्नर, खेड, हवेली आणि शिरूर या तालुक्यात हे पद जाणार असल्याचे निश्चित झाल्याने इच्छुकांची धावपळ सुरू आहे. या विषय समित्यांसाठी शांताराम इंगवले, मिलिंद वाळुंज, करण खलाटे,विष्णू हिंगे,विक्रम खुटवड,जितेंद्र बडेकर,मोनिका हरगुडे,छाया तांबे ही प्रमुख नावे चर्चेत आहेत.