आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune खेड शिवापूर टोल नाक्यावर दरवाढ; जाणून घ्या नवीन नियम

नितीन देशपांडे   278   01-04-2026 16:22:17

Pune 

पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात सुमारे 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही नवी दरवाढ 1 एप्रिल 2026पासून लागू झाली आहे.

नेमकी दरवाढ किती? | Pune Satara Khed Shivapur Toll Price Hike

पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सरासरी 3 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. कार, जीप यासारख्या हलक्या वाहनांपासून ते अवजड ट्रक आणि मल्टी-ॲक्सल वाहनांच्या दरातही वाढ झाली आहे.

रोख व्यवहार पूर्णपणे बंद

यावेळच्या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे व्यवहारांची पद्धत. आजपासून टोल नाक्यावर रोख रक्कम (Cash) स्वीकारणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सर्व व्यवहार आता केवळ 'फास्टॅग' (FASTag) किंवा डिजिटल माध्यमातूनच होतील. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल किंवा ज्यांच्या फास्टॅगमध्ये पुरेशी शिल्लक नसेल, त्यांना दुप्पट दंड भरावा लागणार आहे. टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांना आवाहन

टोल प्रशासनाने स्थानिक नागरिकांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी तरतूद कायम ठेवली आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या गैर-व्यावसायिक वाहनांसाठी सवलतीच्या दरातील मासिक पास सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमित भाटिया यांनी केले आहे. यामुळे स्थानिक वाहनचालकांना दररोजच्या प्रवासात मोठी सवलत मिळू शकणार आहे.

बंगळुरू-पुणे (NH-48) खेड शिवापूर टोल प्लाझा

खेड शिवापूर टोल (पुणे-बंगळुरू महामार्ग)

नवीन / सध्याचे दर (1 एप्रिल 26 पासून लागू) (NHAI च्या माहितीनुसार)वाहन प्रकार आणि दराची माहिती

 

  1. कार / जीप / व्हॅन - एकमार्ग 125 रुपये, परतीचा प्रवास 185 रुपये
  2. LCV - एकमार्ग 200 रुपये, परतीचा प्रवास 295 रुपये
  3. बस / ट्रक - एकमार्ग 415 रुपये, परतीचा प्रवास 620 रुपये
  4. 3 अ‍ॅक्सल - एकमार्ग ₹650 रुपये,परतीचा प्रवास 975 रुपये
  5. 4-6 अ‍ॅक्सल - एकमार्ग ₹650 रुपये,परतीचा प्रवास 975 रुपये
  6. 7+ अ‍ॅक्सल - एकमार्ग 790 रुपये,परतीचा प्रवास 1190 रुपये

 

जुने दर (वर्ष 2024)
कार: 115 रुपये → 120 रुपये (दरवाढीनंतर)
LCV: 185 रुपये → 190 रुपये
बस/ट्रक:390 रुपये → 400 रुपये
जड वाहने: 415 रुपये → 420 रुपये

यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग (Mumbai-Pune Expressway) टोल दर

नवीन टोल दर

वाहन प्रकार एकमार्ग - टोल
कार / जीप / SUV - 320 रुपये
LCV / मिनीबस - 495 रुपये
2-अ‍ॅक्सल ट्रक - 685 रुपये
बस - 940 रुपये
मल्टी-अ‍ॅक्सल - 1630 रुपये- 2165 रुपये

हे दर सध्या लागू असून प्रवासासाठी मुख्यतः खालापूर आणि तळेगाव टोल समाविष्ट असतात


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.