आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यातील मंडईतील खरेदी स्वस्त मात्र पार्किंग महाग; आयुक्त साहेब लक्ष द्या पार्किंगची लूट थांबवा?

शरद लाटे  140   29-03-2026 21:00:56

पुणे प्रतिनिधी -: पुणे : मंडई येथील सतीश मिसाळ वाहनतळ येथे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. येथे तासाला 5 ते 10 रुपये असे पार्किंग शुल्क आहे, मात्र येथील कर्मचारी गुंडगिरी करून तासाला 40 रुपये शुल्क करतात.

पुण्यातील भाजी मंडई परिसरातील खरेदी स्वस्त मात्र पार्किंग महाग अशीच परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे एका तासासाठी तब्बल चाळीस रुपयाची आर्थिक लूट टेंडर धारकाकडून होत आहे महापालिका केवळ पाच ते दहा रुपये आकारण्याच्या हिशोबाने ही पार्किंग ठेकेदाराला दिली आहे.

दर फलक का नाही पुणेकरांचा सवाल?

आयुक्त साहेब पार्किंगच्या परिसरात दर फलक का नाहीत याची तुम्ही चौकशी करावी व एलईडी बोर्ड मध्ये दर फलक लावावेत अशी देखील सूचना नागरिकांनी केली आहे.

40 रुपये शुल्क न भरल्यास वाहनांना नुकसान पोचवितात. यामध्ये नगरसेवक आणि महापालिकेचे काही कर्मचारी देखील सामील असावेत. तरी संबंधितांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी समाज माध्यमातून होताना दिसून येत आहे.

डुबलीकेट बिल देत पुणेकरांची मात्र मोठी फसवणूक होताना दिसून येत आहे आयुक्त साहेब यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीच चक्क मुख्यमंत्र्यांना मेल करून पुण्यातील नागरिकांनी दिली आहे.

पुणेकरांची लूट कधी थांबणार? प्रशासनाने तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित टेंडर रद्द करून ही पार्किंग महापालिकेने चालवावी अशी मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.