आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पाकिस्तानी नेता खवळला; Nabil Gabol : 'धुरंधर 2' चित्रपटात दाखवलेला रॉ एजंट मी नाही

नितीन देशपांडे   65   28-03-2026 16:04:50

Pune 

धुरंधर २' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानी नागरिकही चित्रपटाची कथा आणि पात्रांवर भाष्य करत आहेत. स्थानिक राजकारणी नबील गबोलनेही राकेश बेदी यांच्या पात्राबद्दल भाष्य केलं, आणि सांगितलं की जमील जमाली हे पात्र त्याच्यावर आधारित आहे.

धुरंधर २' बद्दल नबील गबोल पुढे म्हणाला, 'त्यात त्यांनी लयारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केलं. लयारीच्या लोकांना त्याची पर्वा नाही. लयारीचे लोक खूप शक्तिशाली आहेत आणि माझी भूमिका, त्यांनी विनोदी दाखवली आहे. राकेश बेदी म्हणालेले, 'ही नबील गबोल यांची भूमिका नाही. मी साधारणपणे सर्वांची, सर्व पाकिस्तानी राजकारण्यांची भूमिका साकारली.' अरे भावा, २००७ मध्ये लयारीचा आमदार नबील गबोल होता.'

खरं तर, आजकाल भारतीयांमध्येच सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू आहे. नबील गबोल शांत का झाला आहे, यावर खूप ट्रोलिंग होत असल्याचं मी पाहतोय. तर, आजची तारीख बघा; आज २६ तारीख आहे. नबील गबोल तुम्हाला सडेतोड उत्तर देतील, जसं आमच्या पाकिस्तानी सैन्याने तुम्हाला उत्तर दिलं, जसं त्यांनी तुमची ६ विमानं पाडली, तसंच लयारी नक्की काय आहे याचं मी सुद्धा तुम्हाला योग्य उत्तर देईन. खरं तर, आता आम्ही 'धुरंधर ३' बनवू. त्याचं नाव 'धुरंधर' नसेल, आम्ही काहीतरी वेगळा विचार करू. त्यावरून खरा नबील गबोल कोण आहे, हे समजेल'

त्याचबरोबर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये नबील म्हणालेला की, 'माझ्यामुळेच राकेश बेदी एवढा व्हायरल होतोय, त्याला जाहिराती ऑफर होत आहेत. कौतुक केलं जातंय.'


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.