आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Ashok Kharat : शंभर रूपये किलोने आणायचा, एक चिंचोका 1 लाखाला विकायचा

शरद लाटे  228   23-03-2026 13:52:57

महिलांवर अत्याचार करणारा भोंदू अशोक खरातचे विविध कारनामे समोर येत असून, त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ज्याद्वारे तो लोकांना वेड्यात काढून त्यांची आर्थिक लूट करत असे व पैसा कमवत असे.

आपल्याकडे येणाऱ्या हायप्रोफाईल भाविकांना तो चांगलेच लूटून घेत.

 

खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करायचा. आपल्याकडील कथित शक्तीचा वापर करत तो लोकांना त्यांच्या जाळ्यात ओढत असे. तो बाजारातून शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. ते चिंचोके कापडाने घासून स्वच्छ केल्यानंतर ते खड्यासारखे चमकायचे, हे चिंचोके खरात ऑफिसमध्ये येणाऱ्यांना मंत्र मारुन भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत विकायचा. खरातच्या निकटवर्तीयांच्या FIR मध्ये याचा उल्लेख आहे.त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैसे उकळत होता. बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे साधे चिंचोके 'दैवी शक्तीचे' असल्याचे सांगत खरातने त्यातील एक-एक चिंचोका तब्बल एक लाख रुपयांना विकलाचे तपासून समोर आलेल्या माहितीतून उघड झाले आहे. नाशिकरोड येथील एक व्यक्ती हे नकली खडे खरातला आणून देत असे.

यासह खरात पाच इंच जाड व वेगवेगळ्या लांबीचे प्लॅस्टिकचा साप, वाघाची कातडी खरेदी करायचा. या साहित्यांद्वारे भाविकांना घाबरवायचा. त्यांच्याकडून पैशांची लूट करायचा. एकप्रकारे यातून खरात लोकांच्या भावनेशी खेळत होता.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.