आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा, सात ओळींच्या पत्रात काय म्हटलंय? भोंदूबाबा प्रकरणात पहिली विकेट

नितीन देशपांडे   115   20-03-2026 22:19:51

Pune 

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर यांना नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण भोवलं आहे. अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. जेवढा संताप त्याच्या त्या अघोरीपणाचा आहे तेवढाच तो भोंदूवर राजकीय छत्रछाया धरणाऱ्या रुपाली चाकणकरांबद्दल आहे. कारण त्यांच्यावर होणारे आरोप. त्या भोंदूबद्दलची त्यांची जवळीक. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत मोठा राजकीय स्फोट केलाय.

तंत्रमंत्र करणारा तंत्रज्योतिषी आणि काळी जादू करणारा अशोक खरात याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता तीव्र झाली आहे.

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं. त्यातच रूपाली चाकणकरांमुळे खरातच्या विरोधातील तक्रारी घेतल्या गेल्या नाही, अशी माहिती समोर आली. एका पत्रकारावर दबाव टाकून त्याला माफी मागायला लावण्यात आली होती. त्यातच आता सुषमा अंधारे यांनी अत्यंत धक्कादायक दावा केलाय. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी स्वतःची अनामिका कापली होती, असा दावा अंधारेंनी केलाय. सोमवती अमावस्येला चाकणकरांनी अनामिका कापली. महिला आयोगाच्या अध्यक्षा तंत्रमंत्रात असणं गंभीर आहे, असे अंधारे म्हणाल्या. दाव्याची पुष्टी करण्यासाठी अंधारेंनी काही फोटोही दाखवले. त्यात चाकणकर यांच्या बोटाला बँडेज बांधलेलं स्पष्ट दिसतंय.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.