आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

वडिल वारलेत, आई गरीब, मामाकडे राहतेय चिमुकली; अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मुलीची व्यथा

नितीन देशपांडे   132   18-03-2026 11:50:25

वडिल वारलेत, आई गरीब, मामाकडे राहतेय चिमुकली; अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मुलीची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा

संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यातच आला आहे. हल्ला करुन आरोपी फरार झाला आहे.

ही घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पानगावात घडली आहे. या प्रकरणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. वडगाव पान येथील 13 वर्षीय मुलीवरील ॲसिड हल्ला केलेली घटना अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी थोरातयांनी केली आहे.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करण्याचीमागणी

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे करण्याची मागणी देखील जयश्री थोरात यांनी सरकारकडे केली आहे. पीडित मुलीची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडिलांचे निधन झाले आहे, आई गरीब आहे, मुलगी मामाकडे राहून शिक्षण घेत होती. निष्पाप मुलीवर झालेला हल्ला म्हणजे समाजातील वाढती दहशत आणि असुरक्षितताअसल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. राजकारण, जात, धर्म बाजूला ठेवून गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जयश्री थोरात यांनी केली आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन गुन्हेगार शोधण्यासाठी मदत करावी. प्रशासनाने अधिक सतर्क राहून तातडीने आरोपीला पकडावे असे थोरात म्हणाल्या.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे,इथं महिलांचा सन्मान होणे अपेक्षित आहे. अशा घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असल्याचेजयश्री थोरात म्हणाल्या. मुलींना पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरुअसताना अशा घटना समानतेस अडथळाआणत आहेत. सलगघडणाऱ्या घटना चाकू हल्ला, ॲसिड हल्ला म्हणजे परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे थोरात म्हणाल्या. समाजाने जागृत होऊन महिलांच्या सुरक्षेसाठी एकत्र येण्याची गरजआहे. आम्हीसंगमनेर तालुक्यातून घटनेचा तीव्र निषेध करतो असे थोरात म्हणाल्या. वडील नसल्याने आई व मुलगी मामा व आजी आजोबांकडे राहायला होती. घरापासून दोनकिमीअंतरावरअसणाऱ्या शाळेत ही मुलगी इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

घरापासून शाळेत जाण्यासाठी रोज दोन किमी सायकलवरुन प्रवास करत होती. मुलीच्या घरचीपरिस्थिती सामान्य आहे. वडील नसल्यानेआई व मुलगी मामा व आजी आजोबांकडे राहायला होती. घरात आई, भाऊ व मुलगी असा परिवार आहे. शाळेतून सायकलवरुन परतत असताना हा हल्ला झाला आहे. मुख्य रस्त्यापासून घर वस्तीवर असल्याने छोटा रस्ता आहे. घराजवळील रस्त्यावर कमी घर असल्याने आरोपीने हे कृत्य केले. मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

ज्याने हा हल्ला केला आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला सोडायचा नाही

माझी मुलगी दररोज सकाळी सात वाजता शाळेत जात होती, शाळा सुटली घरी येत होती. हा हल्ला कोणी केला हे सांगू शकत नाही, पण ज्याने हा हल्ला केला आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला सोडायचा नाही अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने दिली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.