Pune युद्धाचे थेट परिणाम जगातील इतर देशांवर होत आहेत. गॅसचा प्रचंड मोठा तुडवटा जाणवत सुरू आहे. कच्चे तेल अनेक देशांमध्ये आयात होणे बंद आहे. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा परिणाम गंभीर दिसून येत आहे.
पाकिस्तान सरकारकडून अगोदरच शाळा, महाविद्यालय दोन आठवड्यांकरिता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, अधिकृत जेवण आणि इफ्तार पार्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रमजानच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचे आयोन केले जाते. मात्र, आता पाकिस्तान सरकारकडून थेट इफ्तार पार्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तान सरकारने काढलेल्या या आदेशानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली. हे मोठे संकट असल्याचेही पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तान कायम अमेरिकेचे कान भरून देताना दिसतो. मात्र, आता इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट फटका अमेरिकेलाही बसताना दिसत आहे.