आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भूम-परांडा-वाशी पंचायत समित्यांवर डॉ.तानाजीराव सावंत यांचे वर्चस्व

शरद लाटे  6   07-03-2026 08:05:22

तिन्ही पंचायत समिती सभापती पदांवर शिवसेनेचा भगवा

धाराशिव (प्रतिनिधी) – आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी प्रतिष्ठेची मानली जाणारी भूम, परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांच्या पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. या तिन्ही पंचायत समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत डॉ.तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी तसेच इतर पक्षांनीही जोरदार आव्हान उभे केले होते. मात्र भूम-परांडा-वाशी या तिन्ही तालुक्यांमध्ये सावंत यांनी पंचायत समित्यांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत आपली सत्ता प्रस्थापित केली आणि गड कायम राखला.

परांडा पंचायत समिती येथे सभापतीपदी अर्चना जाधव यांची तर उपसभापतीपदी परसु गवारे यांची निवड झाली आहे.

भूम पंचायत समितीमध्ये अटीतटीच्या लढतीत सभापतीपदी पूजा ढगे विजयी झाल्या असून उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडी समर्थित रण बागुल यांनी विजय मिळवला आहे.

तर वाशी पंचायत समितीमध्ये सभापतीपदी प्रणिता गायकवाड आणि उपसभापतीपदी नितीन रणदिवे यांची निवड झाली आहे.

पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.