आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

भाजप आमदार अतुल भोसलेंच्या वडिलांकडून 600 कोटींचा घोटाळा;

नितीन देशपांडे   78   02-03-2026 15:48:22

PUNE 

Sakhar Karkhana : कृष्णा कारखाना कायम सभासदांच्या मालकीचा रहावा, त्याच्यावर खासगीकरणांचे गंडांतर येऊ नये यासाठी आपण येणारी निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे सांगत कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी रेठरे बुद्रुक (ता.कऱ्हाड) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लढाईचे रणशिंग फुंकले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते तसेच भाजपा, शिवसेना पक्षातील अविनाश मोहिते यांना मानणारे प्रमुख कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.

 

मोहिते म्हणाले, गेल्या दोन निवडणूक निकालात गोंधळ, बनवाबनवी निर्माण करून डॉ. सुरेश भोसले यांनी निवडणुका जिंकल्या असल्या तरी तो सभासदांच्या मताचा कौल नव्हता. यावेळी जून महिन्याच्या दरम्यान कृष्णा कारखान्याच्या निवडणुका होणार असल्या तरी 3 महिने अगोदरच कार्यकर्त्यांना कामाला लागा. प्रत्येक सभासदापर्यंत पोहचा. असा कानमंत्र अविनाश मोहिते यांनी दिला आहे, यामुळे कृष्णेची निवडणूक मोठ्या संघर्षात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

 

गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडे जाणार :

 

डॉ. भोसले यांनी मयूर सहकारी कुक्कुट पालन संस्थेच्या ६०० कोटी मूल्य असलेल्या १४८ एकर जमिनी बोगस गृहनिर्माण संस्था निर्माण करून तसेच शेतकरी शिक्षण मंडळाच्या नावे करण्याचे धोरण अवलंबिले असून टप्पाटप्प्याने जमिनी हडप करण्याचे षड्‍यंत्र सुरू केले आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी आपण ईडी मार्फत चौकशी लावणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

 

Sangli ZP : भाजपला धक्का देण्याचा राष्ट्रवादीचा 'बी प्लॅन': दोन सदस्य व्हीप झुगारणार, पुन्हा निवडून आणण्याची 'या तीन' नेत्यांवर जबाबदारी!

डॉ. भोसले कऱ्हाडमध्ये, देशपांडे अध्यक्षांच्या केबिनमध्ये :

कृष्णेचे अध्यक्ष डॉ. भोसले कऱ्हाडला राहतात, त्यांच्या जागी कारखान्याची सभासद नसलेली चारूत्त देशपांडे नावाची व्यक्ती कारखान्याचा कारभार पाहते. भाडोत्री अध्यक्षांचा विद्यमान संचालक मंडळास विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू आहे. ही बाब सभादांची घोर फसवणूक आहे.

गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडे जाणार :

डॉ. भोसले यांनी मयूर सहकारी कुक्कुट पालन संस्थेच्या ६०० कोटी मूल्य असलेल्या १४८ एकर जमिनी बोगस गृहनिर्माण संस्था निर्माण करून तसेच शेतकरी शिक्षण मंडळाच्या नावे करण्याचे धोरण अवलंबिले असून टप्पाटप्प्याने जमिनी हडप करण्याचे षड्‍यंत्र सुरू केले आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी आपण ईडी मार्फत चौकशी लावणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.