आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

अजितदादांचा अपघात की घातपात? अवघ्या काही तासात मोठा खुलासा होणार;

नितीन देशपांडे   354   28-02-2026 15:34:57

Pune  अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असतान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ हा अपघात घडला. या घटमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली.

अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित करत हा अपघात आहे की घात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

संध्याकाळी सादर होणार अहवाल

आज संध्याकाळी DGCAचा प्राथमिक अहवाल येणार आहे. हा अहवाल DGCA त्यांच्या अधिकृत वेब साइटवर प्रकाशित करणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. या अहवालात नेमकं काय असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एएआयबीने जो एक महिनाभर तपास केला त्यावरती हा अहवाल असणार आहे. प्राथमिक अहवालातील मुद्द्यांवर अंतिम अहवाल प्रकाशित केला जाणार आहे. आज संध्याकाळी हा संपूर्ण अहवाल प्रकाशित होणार आहे. या अहवालात आतापर्यंत या प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला याची सविस्तर माहिती असणार आहे.

आज नेमकी कोणती माहिती समोर येणार?

एएआयबी ही जी DGCAची एजंसी आहे ती संपूर्ण एक महिना अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास करत आहे. या तपासाच्या आधारे प्राथमिक अहवाल संध्याकाळपर्यंत सादर करण्यात येणार आहे. या अहवालात महिना भराच्या तपासातील प्राथमिक मुद्दे असणार आहेत. या अहवालात हा अपघात कसा झाला? यामध्ये दोषी कोण आहे? याबाबत प्राथमिक माहिती पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विमान अपघातानंतर जे व्हीसीआर सापडलं होतं. ते अमेरिकेच्या कंपनीने बनवले होते. तो व्हीसीआर अमेरिकेत पाठवायचा की अमेरिकेतील प्रतिनिधी भारतात बोलवायचे याबाबतही माहिती समोर येईल.

DGCA आणि AAIB कडून तपास सुरू

केंद्र सरकारने अजित पवारांच्या या अपघाताची गंभीर दखल घेतली होती. DGCA आणि AAIB कडून सखोल चौकशी सुरू होती. ब्लॅक बॉक्स, फ्लाइट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते. कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आज DGCAचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.