आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शरद पवारांचा आवाज दाटला अन् अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं; भावूक प्रसंग

शरद लाटे  369   26-02-2026 15:26:59

Pune News 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या विविध चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक आठवण सांगितली. "सुरुवातीला मीच म्हणालो होतो की, आता विलीनीकरण करून काही फायदा नाही. मात्र, अजितदादांची एकत्र येण्याची एक भावनिक इच्छा होती. एकत्र येणे ही त्यांची इच्छा होती"

"अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांचे निधन झाले तेव्हा दादा अवघ्या १८ वर्षांचे होते. त्यानंतर शरद पवार साहेबांनीच अजितदादांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले. हे दादांच्या मनात कायम आहेत. जेव्हा रेवती सुळे हिचे लग्न ठरल्याचे सांगण्यासाठी शरद पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला होता. मात्र, त्यावेळी साहेबांना कफ झाल्यामुळे नीट बोलता येत नव्हते. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हते, ही परिस्थिती बघितल्यामुळे दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितले आहे. मग ही भावनिक भूमिका असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू?, असा सवाल रोहित पवार यांनी केला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.