आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

होळीच्या दिवशी ड्राय डे असणार आहे की नाही? 'त्या' बातमीबद्दल राज्य सरकारने स्पष्ट सांगितलं

नितीन देशपांडे   112   25-02-2026 12:49:35

Pune 

कधी आहे होळी? असं म्हणत आतापासूनच तळीरामांकडून पार्ट्यांचं आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी तळीराम मंडळी दारू प्यायला काहीच मागे पुढे न पाहता कमी करत नाही.

अशातच महाराष्ट्र सरकारच्या एका व्हायरल निर्णयामुळे तळीरामांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. होळी, मोहरम आणि गांधी जयंतीला ड्राय डे असणार नाही, अशी बातमी व्हायरल झाली होती. त्यामुळे होळीच्या तोंडावर सरकारने असा कोणता निर्णय घेतला आहे का? याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पण, अखेरीस राज्य सरकारने हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे.

होळी जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे तळीराम मंडळी नियोजनाच्या गडबडीत असतानाा ड्राय डे नसणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे, गांधी जयंतीला ड्राय डे हा शंभर टक्के असतो, पण या दिवशीही ड्राय डे नसणार आहे, आता महाराष्ट्रात दारू विक्रीला परवानगी आहे, अशी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. पण, अखेरीस महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने असा कोणताही निर्णय घेतला नाही, असं स्पष्ट केलं आाहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.