आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Rohit Pawar : "अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ३००० तासांचा रेकॉर्डच उपलब्ध नाही

नितीन देशपांडे   310   24-02-2026 16:01:44

Pune 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले असून त्यांचा घातपात झाला असल्याचा दावा अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार पोस्टमध्ये म्हणाले, 'स्व.अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी, बनवाबनवी VSR ला करता यावी यासाठी चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

'महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल तर DGCA ने CID ला कळवणे आवश्यक का समजले नाही?' असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.