आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडेंनी अजितदादांच्या पक्षातून भाजपचा संसार करण्यापेक्षा तत्काळ भाजपत प्रवेश करावा

नितीन देशपांडे   472   24-02-2026 11:04:05

Pune news 

लग्न एकाशी आणि संसार एकाशी' असं करण्यापेक्षा अजित दादांच्या पक्षात राहून भाजपचा संसार करण्यापेक्षा प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी थेट भाजपमध्ये जावं.

कारण भाजपमध्ये गेल्यामुळे थेट तुम्हाला संसारही चांगला करता येईल आणि उघडपणे तुम्हाला त्यांच्या भूमिका मांडता येतील, अशा शब्दात सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक विकास लवांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियातून पोस्ट करताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

म्हणून भाजपची मनधरणी करत आहात

लवांडे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणतात, ते प्रफुल्ल भाई पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी अजित दादांच्या पक्षात राहून भाजपचं काम करण्यापेक्षा, ईडीग्रस्त असल्यामुळे चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये आपण अडकला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात.

गुजरात वॉशिंग मशिन' मधून तुमची क्लिअरिटी मिळेल

विकास लवांडे यांनी पुढे म्हटलं आहे की, तुम्ही ज्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये, कारवाईच्या फेऱ्यांमध्ये अडकला आहात, त्याची सुटका भाजपच्या 'गुजरात वॉशिंग मशिन' मधून तुमची क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्थपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तात्काळ भाजपमध्ये जावं. काहीही नुकसान होणार नाही महाराष्ट्राचं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये, असा टोला लगावला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.