आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर

शरद लाटे  314   22-02-2026 16:02:33

 

इंडियन सोशल मूव्हमेंट – सम्यक संस्था व “आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या सौजन्याने आयोजन

मुंबई प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर 

   बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंडियन सोशल मूव्हमेंट – सम्यक संस्था तसेच “आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत समाज मंदिर, मुकुंद नगर, उल्हासनगर-१ येथे हे शिबिर पार पडणार आहे.या शिबिरात विविध नामांकित रुग्णालयांच्या सहकार्याने मोफत तपासण्या व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवाधाम हॉस्पिटल (उल्हासनगर-४), एम्स हॉस्पिटल (डोंबिवली), अल्केम लाईफ कंपनी (कल्याण) तसेच श्यामन कॅन्सर केअर (गोवेली) यांचे सहकार्य लाभले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मार्गदर्शन व आवश्यक उपचारांसाठी नोंदणी करण्यात येणार आहे.अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, फ्रॅक्चर व हाडांचे उपचार, डायलिसिस, कॅन्सर तपासणी व सल्ला, मधुमेह (RBD) तपासणी, ईसीजी (ECG), रक्तदाब तपासणी, डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी, श्रवण तपासणी, SpO2 (ऑक्सिजन लेव्हल) तपासणी, फुफ्फुस व सांधेदुखी तपासणी आदी सुविधा शिबिरात उपलब्ध राहणार आहेत. तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.

   या उपक्रमाचे आयोजन आनंदा होवाळ संस्थापकीय अध्यक्ष, इंडियन सोशल मूव्हमेंट, मैत्रेय हयाळींग संस्थापकीय अध्यक्षनसम्यक संस्था, आयु. देवेन ज्योती वांझिरे कांबळे सचिव, सम्यक संस्था तसेच “आम्ही भारताचे लोक” आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ टिम यांच्यानेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

   आयोजकांच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.