आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, पुण्यातील रुग्णालयात केलं दाखल

शरद लाटे  478   22-02-2026 09:39:06

Pune 

शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. कार्डिअॅक रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्यात हलविण्यात आलं होतं. आज पुन्हा शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.