आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

आपल्या भागाच्या शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या सौ. युगंधरा पारखीनां विजयी करा - प्रदेश सचिव नवनाथ पारखी

शरद लाटे  292   05-02-2026 16:53:24

स्थानिक नेतृत्वाकडून बदनामीचा कट सुरूच; काम करणाऱ्याला संधी द्या नवनाथ पारखीचीं भावनिक साथ

मुळशी प्रतिनिधी -: मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची अधिकृत प्रचाराची सांगता उद्या गुरुवारी रात्री दहा वाजता होणार आहे. जिल्ह्यात तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांनी राजकीय वातावरण तापले असून या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. रात्रीपासून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार आहे. अनेक मतदार संघात 'काँटे की टक्कर' लढत असल्याने ‘लक्ष्मी दर्शन’ ची शक्यता नाकारता येत नाही.

याचबरोबर मुळशी पंचायत समिती 69 माण पंचायत समिती गटाची निवडणूक देखील हाय व्होल्टेज मोडमध्ये दिसून येते.

माण पंचायत समिती गणनातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी या निवडणूक लढवत असून यांची प्रचार यंत्रणा देखील प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली दिसून येते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पारखी म्हणाले की जाणीवपूर्वक काही स्थानिक मंडळी जाणीवपूर्वक भाजपाच्या कमळ या चिन्हाच्या उमेदवाराची नाहक बदनामी करत आहेत मात्र याला जनता कधीही  भूल थाप्याला बळी पडणार नाही.

गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे निधी खेचून आणण्याची धमक आपल्या उमेदवारामध्ये आहे. आपल्या भागाच्या प्रलंबित विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद देऊन मोठ्या मताने विजयी करा असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पार्टी यांनी केले आहे.

युगंधरा पारखी यांना प्रचार रॅली दरम्यान व संवाद दौऱ्या दरम्यान नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे नात्यागोत्याच्या व जिव्हाळ्याच्या संबंधामुळे पारखी यांचे पारडे जड मानले जात आहे.

शनिवार (७ फेब्रुवारी) रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी (९ फेब्रुवारी) रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याने मतदारांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात कमालीची ताकद लावली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.