आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण

नितीन देशपांडे   18   08-10-2025 12:21:24

Pune सोन्या-चांदीचे भाव सध्या गगनाला भिडलेत... मात्र भविष्यात याचं सोन्या- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण (Gold and Silver Prices Likely to Drop Soon) पाहायला मिळणार आहे... सोन्या- चांदीच्या किंमतीबाबत तज्ज्ञाचं नेमकं काय म्हणणं आहे

सोन्याच्या बाजारात आज ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली असून, प्रति तोळा सोन्याची किंमत ₹1,23,000 च्या पुढे पोहोचली आहे. हा दर आजवरचा सर्वाधिक ठरला असून, सोन्याने आज सर्वकालीन उच्चांकाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

2008-2011 ला रुपयाच्या तुलनेत डॉलर्स कमकुवत झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमती 10-15 टक्के घसरण झाली होती... त्यामुळेच भविष्यात सोन्याच्या किंमतीत 30-35 टक्के तर चांदीच्या किंमतीत 50 टक्क्यांने घट होण्याची शक्यता आहे.. ज्यामुळे सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 77 हजार 701 पर्यंत तर चांदीच्या किमती प्रति किलो 77 हजार 450 होऊ शकते... जगावर आर्थिक मंदीचं सावट असल्यानं या किंमतीत घसरण होऊ शकतं..

आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹12,332 इतकी आहे. 8 ग्रॅम सोन्याचे भाव ₹98,656, 10 ग्रॅमचे ₹1,23,320 तर100 ग्रॅमचे ₹12,33,200 इतके आहेत. 22 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति ग्रॅम ₹11,305 असून, 8 ग्रॅम ₹90,440, 10 ग्रॅम ₹1,13,050 आणि 100 ग्रॅम ₹11,30,500 इतके आहेत. 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹9,253 असून, 8 ग्रॅम ₹74,024, 10 ग्रॅम ₹92,530 आणि १०० ग्रॅम ₹9,25,300 इतकी आहे. दरम्यान, चांदीच्या बाजारातही किंमतीत स्थिरता दिसत आहे. आज चांदीची किंमत प्रति ग्रॅम ₹157 तर प्रतिकिलो ₹1,57,000 इतकी आहे. सोन्याच्या या ऐतिहासिक वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंद असून, दिवाळीच्या सणासोबतच सोन्याच्या बाजारात नवा उत्साह पाहायला मिळत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.