आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

३१ व्या पुणे नवरात्री महोत्सवाचे आयोजन

अजिंक्य एकाड   27   16-09-2025 12:48:19

 

 

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

 

कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदा ३१वे वर्ष दिमाखात साजरे करीत असून, महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. २२ सेप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नागरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. मेधा कुलकर्णी, आ.डॉ. विश्वजीत कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

उद्घाटनाचे खास आकर्षण

 

या उद्घाटन सोहळ्यात सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी असेल. या महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

 

सोमवार दि. २२ सप्टेंबर घटस्थापनेच्या दिवशी शिवदर्शन येथील श्री. लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.४१ मि. या शुभमुहूर्तावर विधिवत घटस्थापना केली जाईल. या मंदिरात यंदा माधुराई येथी ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा साकारला जात असून दक्षिणेकडील सुमारे ८० कलावंत या देखाव्याचे काम करीत आहेत.

 

दरवर्षी दिले जाणारे महर्षी लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार

 

या उद्घाटन सोहळ्यात उतुंग कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तीस दरवर्षी 'महर्षी पुरस्कार' देऊन गौरवले जाते. यंदा भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन शिक्षण व संस्कार यासाठी अविरत काम करणारे समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाईल. असे आबा बागुल यांनी सांगितले.

 

त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यात श्री. लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.