आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 गडचिरोली

मराठ्यांनी सावध होणं गरजेचं; पंकजा मुंडेच्या त्या विधानानंतर मनोज जरांगे

शरद लाटे  36   11-09-2025 15:21:07

जालना- मराठा आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांचे मत आधी जसे होते तसेच यापुढेही असणार आहे. कारण कोणत्याही सामाजिक मागास जातींच्या समूहात नव्याने एखाद्या जातीचा समावेश करण्याच्या निर्णयाचे सर्वसाधारणपणे कुठेही स्वागत होत नाही.

ओबीसी नेते मराठा शब्दाला हरकत घेत आहेत. यामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल असा त्यांचा दावा आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात दंड थोपाटले आहेत.

नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा

https://whatsapp.com/channel/0029Vb9Qt92Gk1FpQ0gsYf1M

तर दुसरीकडे ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी बोगस प्रमाणपत्राविषयी सूतोवाच केले. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एका ओळीत असा इशारा दिला.

मराठ्यांनी सावध होणं गरजेचं

पंकजा मुंडे काय बोलल्या, हे मी ऐकलेलं नाही, परंतु मला वाटत नाही की त्या असं बोलतील म्हणून, जर बोलल्याच असतील तर मराठ्यांना सावध होणं गरजेचं आहे, असे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. मराठ्यांना ज्या माणसांसाठी तुम्ही धरपड्या मारल्या ज्यांचे राजकीय करिअर मोठा होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असून सुद्धा मराठी जातीच्या विरुद्ध जाता तेच माणसं जर कुणबी प्रमाणपत्र निघाले असतील आणि त्याच प्रमाणपत्रावर गोरगरीब लेकरांच्या मुळावर घाव घालायचा प्रयत्न करत असतील तर हे अवघड आहे, असे जरांगे म्हणाले.

तर मग जशाच तसं उत्तर

परंतु माझा विश्वास अजूनही बसत नाही की त्या मराठ्यांविषयी बोलल्या असतील. त्या जर बोलले असतील आणि ते सत्यच असेल तर आम्हाला सुद्धा तशाच तसे उत्तर द्यावं लागेल, जशास तसे बोलावं आणि वागावं लागणार आहे त्याला आमचा नाईलाज आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठ्यांनी आता रोख ओळखावा आणि जात ओळखावी जातीचे नेते पण वाचवावे यासाठी मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावे. कारण शेवटी मराठ्यांची बाजूवाली आणि समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात. आपलीच मतं घेऊन आपल्या विरोधात विष घालवण्याचे काम करत आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा नेत्यांनी आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी आता विचार करणे गरजेचे आहे. की तुमच्यासाठी आता जात महत्त्वाची आहे.

जात जातीची लेकरं आणि तो जीआर जिवंत ठेवून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीने एक बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे.आपलं खरे आरक्षण असून हे जर बोगस म्हणणारे असेल तर हे बोगस आरक्षण 16 टक्के खात आहे आणि वर्ष 2% 50% च्या वरील हे सुद्धा बोगस खात आहेत. आपल्याविषयी सरकारच्या नोंदी दस्तऐवज मधील असतील तर मात्र आता विचार करायची वेळ आहे. कारण ते सुद्धा आता बोगस आरक्षण खात आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला आवाज उठवा लागणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.