मुंबई : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना 2018 साली घडलेल्या प्रकारात अडथळा निर्माण करणे आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण तब्बल सात वर्षांपूर्वीचे असून न्यायालयाने कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कर्मचाऱ्याला धमकी आणि अडथळा निर्माण करण्याचा आरोप सिद्ध.
मुंबई हायकोर्टाने ३ महिन्यांची शिक्षा व १० हजार दंड ठोठावला.
प्रहार संघटनेच्या प्रमुखांवर सात वर्षांपूर्वीचे प्रकरण.
2018 साली परीक्षा पोर्टलचा घोटाळा झाला होता. त्यावेळी आयएएस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयात बच्चू कडू यांनी राडा केला होता. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि आता मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी बच्चू कडू यांना दोषी ठरवले आहे. तसेच कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे किंवा त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले. दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत प्रत्येकी 3 महिने शिक्षा आणि प्रत्येकी 5 हजार दंड, अशी एकूण 6 महिने शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महत्त्वाचे म्हणजे उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत बच्चू कडू यांची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. तसेच त्यांना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला. याशिवाय अपमानाच्या आरोपातून बच्चू कडू यांची सुटका करण्यात आली आहे.