पिंपरी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 16 विकासनगर,दत्तनगर, भीमाशंकरनगर, किवळे, साईनगर, मामुर्डी, या भागात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शिंदे शिवसेनेचे मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे केली आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दि.11 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश पारित केला असून, त्यानुसार नवी दिल्ली व एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) क्षेत्रामध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या रॅबीज आणि कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करून तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रभाग क्रमांक 16 विकासनगर,दत्तनगर, भीमाशंकरनगर, किवळे, साईनगर, मामुर्डी, या भागात भटके श्वान अधिक झाल्यामुळे येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो, भटक्या कुत्र्यांची समस्या ही केवळ अस्वच्छतेची नव्हे, तर थेट जनतेच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. यावर त्वरित मार्ग काढावा अशी मागणी शिवसेनेचे मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे