Pimpri-Chinchwad police पुढील आठवड्यापासून उत्सवांच्या रंगात रंगणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि 16 ऑगस्टला दहीहंडी (dahi handi) उत्सवाने उत्सवाचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे प्रमुख सण येतील.
याप्रसंगी होणारी प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहता, पोलिसांनी सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे.
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.१०) दुपारी शंकरनगर येथील खदानीजवळ करण्यात आली.
पोलिस नाईक रामचंद्र तळपे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूरज शहाजी शेवाळे (२५, रा. अष्टविनायक चाळ, पावनेगाव, तुर्भे, नवी मुंबई) याला पोलिसांनी अटक केली.
विद्यानगर येथे खदानीजवळ एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्याच्याकडून ४० रुपये किमतीची पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त केले.