आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 लातूर

लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं

शरद लाटे  322   11-08-2025 20:26:49

Latur Maharashtra (Ramesh Karad) लातूर ग्रामीण) म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे. आमच्या मतदारसंघात सतरंजीसुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूस येत नव्हता, कुणी राम राम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांनी नाव न घेता काँग्रसे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली. लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, या कार्यक्रमात कराड बोलत होते. मुंडे साहेबांनी जी वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला, मला विधानसभेची उमेदवारी दिली,. रेणापूर मतदारसंघाचे नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं, त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. आयुष्यभर मुंडे साहेबांनी संघर्ष केला. मुंडे साहेबांनी जी वाट दाखवली त्या रस्त्याने जाण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे कराड म्हणाले. चौंडी येथील सभेत गोपीनाथ मुंडे यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असे सांगितले होते असे रमेश कराड म्हणाले. येथील 90 टक्के भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले आहेत असे रमेश कराड म्हणाले. मला मुंडे साहेबांनी नेतृत्व केलेल्या मतदारसंघाचे काम करण्याची संधी मिळाली आहे. देवेंद्र भाऊ तुम्ही भल्या भल्यांची झोप उडवून लावली आहे असेही कराड म्हणाले. मला या मतदारसंघाचे नेतृत्व करताना अनेक अडचणी होत्या. सभा घेतना अडचणी होत्या. आज काही कामं झाली आहेत. आणखीन काही कामात वाढ करता आली तर खूप उत्तम होईल, आपण सहकार्य करावं असे मत रमेश कराड यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या सहकार्याने रेणापूर मतदारसंघाचा मला विकास करायचाय आमच्या मतदारसंघात सभेला माणूस येत नव्हता. राम राम केला तर ऊस वाळवला जात होता असे रमेश कराड म्हणाले. मुख्यमंत्रीसाहेब तुमच्या सहकार्याने रेणापूर मतदारसंघाचा मला विकास करायचा असल्याचे रमेश कराड म्हणाले. इथे एमआयडीसीची गरज आहे. या ठिकाणी रस्त्याची अडचण आहे, ते रस्ते झाले पाहिजेत असे रमेश कराड म्हणाले. लातूर तालुक्यातील जनतेनं माझ्यावर खूप प्रेम केलं आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.