पुणे (Pune Rupali chakankar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा लाडका मावस भाऊ बाळराजे माळी यांचे काल (९ ऑगस्ट) रात्री दुःखद निधन झाले.
रुपाली चाकणकर यांच्या पोस्टमध्ये काय?
रूपाली चाकणकर यांनी आपल्या लाडक्या भावाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवर एका भावूक पोस्ट लिहिली आहे. "बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास….. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू." असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच "माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप…" असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
बाळराजे माळी यांचा अल्पपरिचय
बाळराजे माळी यांच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी यांचे ते सुपुत्र होते. बाळराजेंच्या अकस्मित मृत्यूनं माळी कुटुंबिय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.
बाळराजे माळी हे रुपाली चाकणकर यांचे लाडके मावस भाऊ होते. बाळराजेंच्या अचानक जाण्याचा धक्का त्यांना बसलाय. या दु:खद प्रसंगी भावाच्या आठवणींना चाकणकर यांनी उजाळा दिला. रक्षाबंधनादिवशीच भावाच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.