पुणे प्रतिनिधी -(Pune Shivsena) शिवसेना पक्षात युवा सेना हे शिवसेनेचे महत्वाचे अंग आहे, युवा सेनेच्या कार्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे, खासदार श्रीकांत शिंदे हे वैयक्तिक रित्या महाराष्ट्रातील प्रत्येक युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची नेहमी संवाद साधताना दिसतात, युवा सेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना मोठी ताकद देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून होते
शिवसेना पुणे युवक जिल्हाप्रमुखपदी सोमनाथ कुटे यांची नियुक्ती झाली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमनाथ कुटे नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे, यावेळी पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
गेली अनेक वर्षे ते राजकारण तसेच समाजकारणात सक्रिय आहेत.
त्यांच्या या निवडीनंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून व आमचे नेते रमेश बापू कोंडे, युवासेनेचे नेते किरण दादा साळी, यांच्या प्रयत्नानंतर पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली आहे या संधीचे निश्चित सोने केल्याशिवाय राहणार नाही पक्ष वाढीसाठी अहोरात्र परिश्रम घेऊन जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे व एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करू.
सोमनाथ कुटे
जिल्हाप्रमुख युवक शिवसेना