आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

झेडपीत अनागोंदी कारभार; आरोग्य सेवकांना मिळेना नियुक्ती

नितीन देशपांडे   106   07-08-2025 11:43:29

पुणे- परिषदेच्या कारभारातील अनागोंदी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पाच महिने उलटूनही आरोग्य सेवक (50 टक्के पुरुष प्रवर्ग) या 128 पदांपैकी 125 पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही

परिणामी, झेडपीत उमेदवारांच्या भविष्यावर गंडांतर आले आहे.

2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून 2024 मध्ये परीक्षा व 2025 च्या मार्चमध्ये कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली. तरीही नियुक्तीच्या प्रक्रियेला चालढकल होत असून, इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या असताना केवळ या संवर्गाची फाइल ढेपाळलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चार उमेदवारांच्या कागदपत्रांतील गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. यातील तीन उमेदवार अपात्र ठरले असून, उर्वरित 125 जणांची यादी पुढील झाल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही जिल्हा परिषद यंत्रणा गप्प आहे.

राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी याच संवर्गातील उमेदवारांना वेळेवर नियुक्त करून सेवेत सामील करून घेतले आहे. त्यांना नियमित वेतनही सुरू आहे. मग पुण्यातच ही प्रक्रिया रखडते कशी, असा संतप्त सवाल उमेदवारांकडून विचारला जात आहे


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.