आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 लातूर

बावनकुळेंचा पोलीस ठाण्यात फोन; काटेला मदत करा गायकवाडांचा गौप्यस्फोट

शरद लाटे  634   14-07-2025 17:59:41

Pune () प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे, असा दावा उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.

प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल झालेल्या घटनेनंतर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेचा आणि भाजपचा कुठलाही संबंध नाही. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी तो आरोपी असतो. दीपक काटेने प्रवीण गायकवाड यांच्यासोबत असे वर्तन करायला नको होते. हे भाजपला मान्य नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

RSS ची मीटिंग झाली...'

"आमचा सामाजिक समतेचा, बंधुतेचा आणि मानवता प्रस्थापित करण्याचा विचार आहे. 2014 पासून मनुस्मृतीच्या, वर्णवर्चस्वाच्या विचारसरणीचा म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी विचाराचा संघर्ष सुरु झाला आहे. अशा प्रकारच्या संघटना संपवल्या पाहिजेत अशी मीटिंग संघ परिवारात मागच्या महिन्यात झाली होती. त्यानंतर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी अशा पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. ही सगळी चर्चा काही माझ्या मित्रांकडून कळाली होती," असा दावा त्यांनी केला आहे.

 

पुढे त्यांनी सांगितलं की, "अक्कलकोटचे जलमाजीराजे भोसले यांचा सत्कार माझ्या हस्ते होता. एक सामाजिक कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मला निमंत्रित करत गाफिल ठेवण्यात आलं. माझ्यावर हल्ला करणाऱ्यावर 10 गुन्हे आहेत. बावनकुळे यांनी कारवाई करु असं सांगितलं आहे. पण त्यांनीच पोलीस स्टेशनला फोन करुन त्याला (दीपक काटे) हवी ती मदत दिली पाहिजे असं सांगितलं".

 

"दीपक काटे हे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने ते काम करतात. त्यांचा आमच्यावर छोटा आक्षेप आहे की, संभाजी यांचा एकेरी उल्लेख होत असल्याने महाराजांचा अपमान होतो. छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करा असा त्यांचा आग्रह आहे. मी त्यांनी समजावून सांगितलं की, आपल्याला धर्मादाय आयुक्तांकडे जावं लागेल. दुरुस्ती कराव्या लागतील. नंतर लक्षात आलं की, छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना मुंबईतील सचिन कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने नोंद केली असून त्याचं काम सुरु आहे," अशी माहिती त्यांनी दिली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.