आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Katraj News : येवलेवाडी-कोंढवा हडपसर मेट्रो मार्गाला मंजुरी द्या; आमदार योगेश टिळेकर

नितीन देशपांडे   401   11-07-2025 14:08:35

पुणे (Yogesh Tikekar) विधानपरिषद अधिवेशनात पुण्याच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे मांडत आमदार योगेश टिळेकर यांनी शिवाजीनगर ते येवलेवाडी-कोंढवा मेट्रो मार्गाच्या मंजुरीची मागणी केली. शहरातील वाढती वाहतूक, नागरी लोकसंख्या आणि मेट्रोच्या गरजेनुसार हा प्रस्ताव अत्यंत गरजेचा आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. हडपसर-सासवड रोड, हडपसर-लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या

हडपसर विधानसभा मतदारसंघात सिव्हील कोर्ट ते कोंढवा बुद्रुक व खुर्द, येवलेवाडी मेट्रो मार्गास मंजुरी मिळाली आहे. तसेच हडपसर सासवड रोड, हडपसर लोणी काळभोर देखील मार्गिका मंजूर झाल्या आहेत. या मार्गामुळे हडपसरमधून मुख्य शहरासाठी कनेक्टिव्हिटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहेच.परंतु पहिल्या टप्प्यात कात्रज ते हडपसर ही मेट्रो मार्गिका प्राधान्याने सुरू करावी, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.

याशिवाय एमएसआरडीसी मार्फत होणाऱ्या हडपसर ते यवत या १८ किलोमीटरच्या ४-पदरी उड्डाणपुलाचे काम ४० वर्षांनंतर होत आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र, वाहतूक कोंडीचा समूळ नाश करण्यासाठी हा पूल भैरोबानालापासून सुरू करून यवतपर्यंत न्यावा. केवळ २ किलोमीटर वाढवल्यास या भागातील वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल.अशी मागणीही टिळेकर यांनी केली.तर,संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पुण्यात येतात. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना पुण्यात केंद्र महाज्योतीचे स्पर्धा परीक्षा केंद्र मिळावे, असेही त्यांनी सभागृहाला सुचविले.

 

२०१२ साली पुणे महानगरपालिकेत नगरसेवक असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ९ एकर जागेवर भव्य क्रीडांगण सुरू केले. मात्र, दुर्दैवाने आजपर्यंत या प्रकल्पाला शासनाकडून एका रुपयाचाही निधी मिळालेला नाही. आपल्या युवा पिढीसाठी आणि खेळाडूंसाठी या क्रीडा संकुलाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच कात्रज-कोंढवा मतदारसंघातील मोकळ्या जागेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला समर्पित ‘अहिल्या-सावित्री सृष्टी’ उभारावी. हा प्रकल्प आपल्या पुढच्या पिढीला या महान व्यक्तिमत्त्वांचा प्रेरणादायी वारसा देईल.याकडे सभागृहाचे लक्ष आमदार टिळेकर यांनी पुरवणी मागण्या करताना वेधले.

सावता महाराज समाधी सोहळा…

संत सावता महाराज यांचा समाधी सोहळा २० जुलैला अरणमध्ये होत आहे. काशी कापडी समाजाला पालखीचा मान असतो. पालखीचे नियोजन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनाने करावे, अशी मागणी पंढरपूर येथे हरताळे दिंडी मठात संत सावता महाराज धर्मदाय न्यास व भाविकांनी केली आहे. याचा खर्च मंदिर व्यवस्थापनाने करावा, असा आदेश सभापतींनी द्यावा, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.