आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

राज्य सरकारची दूरदृष्टी ऐतिहासिक निर्णयामुळे शहरातील नागरिकांना फायदा होणार - समीर चांदेरे

नितीन देशपांडे   244   10-07-2025 13:46:15

शिवाजीनगर प्रतिनिधी - : राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा घोषणा केली आहे, यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला, 

यावेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी महायुती सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की शेतकऱ्यांबरोबर शहरातील नागरिकांना देखील तुकडा बंदीचा निश्चित मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अनेक वर्षापासून एक दोन तीन गुंठ्याचे खरेदीखत बंद होते त्यामुळे नागरिक संभ्रमात होते आज सरकारच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महायुती सरकार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती. अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात घोषणा करताना लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय आहे तुकडा बंदी कायदा?

तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.