आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

हिंजवडी, माण, मारुंजीसह अनेक गावे पिंपरी चिंचवड पालिकेत समावेशाच्या मार्गावर

शरद लाटे  46   09-07-2025 15:19:27

मुंबई प्रतिनिधी :"- मुळशी व मावळ तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे व गहुंजे या आयटी पार्कलगतच्या सात गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

खासदार श्रीरंग बारणे व आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी हिंजवडीचे वसंत साखरे, तानाजी हुलावळे, आनंद बुचडे, बाबासाहेब साखरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व आयटी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.