आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

Pune पुणे महापालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांच्या जीवाशी खेळ ग्रामस्थांचा आरोप

शरद लाटे  70   09-07-2025 14:03:37

मांजरी प्रतिनिधी::- शेवाळेवाडी येथील अनेक रस्त्यावर चेंबरला झाकण नाहीत, त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेक दिवसांपासून महापालिका या चेंबरकडे दुर्लक्ष करत आहे. मोठी वर्दळ असल्याने चेंबरची   झाकणे तातडीने दुरुस्त करावीत .याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी सांगितले.

शेवाळेवाडी ग्रामपंचायत कार्यालय शेजारील अतिशय वर्दळीच्या असलेल्या रस्त्याच्या कडेला चेंबर उघडे पडले असून, यामुळे वाहनांचा अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या चेंबरची अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली. परंतु, हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्यामुळे या चेंबरचे झाकण अनेकदा तुटले आहे. चेंबरवर लोखंडी जाळीचे झाकण कायमस्वरूपी टाकून उत्तमरीत्या दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. चेंबरवर झाकणे नसल्याने उद्भवणाऱ्या समस्येविषयी अधिक बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की शेवाळेवाडी  गावातील रस्त्यांवर असलेल्या अनेक गटारांना झाकणे नसल्याने रोज अपघात होत आहेत. आज ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या एक  महिन्यांपासून गटार लाईन वरील झाकण तुटल्याने चेंबर उघडा आहे .याबाबत मी गेल्याच आठवड्यात पालिका अधिकारी  यांना घेऊन गावातील सर्व भागाची पाहणी केली होती .सर्व चेंबरवर ताबडतोब झाकणे बसवावीत अशी मागणी केली होती . परंतु अद्यापही कुठेही झाकणे बसवली गेली नाहीत , महानगरपालिका आमच्याकडून फक्त कर वसूल करते. मात्र ,विकास कामे करत नाहीत . याबाबत आम्ही जाहीर निषेध करतो.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.