मुंबई प्रतिनिधी :: bala Nandgaonkar: हिंदी सक्तीचा वरवंटा दूर केल्यानंतर मराठीच्या विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्यासाठी साद घातल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या आहेत. भाजपकडून खोचक टिपणी होत असतानाच मुंबई भाजप अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका केली आहे.
अपूर्ण भाषण असल्याचा टोला सुद्धा शेलार यांनी लगावला. यांच्या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावताना शालजोडा लगावला आहे. आजच्या तारखेला अख्ख्या भारतात आशिष शेलार साहेब एक नंबरचे प्रवक्ते असल्याचा शालजोडा बाळा नांदगावकर यांनी लगावला. शेलार यांचं कौतुक असल्याचेही ते म्हणाले. तुमचा पक्ष काय सामाजिक संस्था आहे का? अशी विचारणा सुद्धा बाळा नंदगावकर यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले टीकेला सुद्धा बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की त्यांना सगळेच माहीत आहे.