आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 चंद्रपूर

पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन उद्योगाला जागतिक स्तरावर चालना मिळणार"

नितीन देशपांडे   177   04-07-2025 15:25:29

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथे पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्यामध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026'चे भव्य आयोजन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. 

'पुणे ग्रँड चॅलेंज टूर'च्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे शक्य होणार आहे. 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितच जागतिक स्तरावर लोकप्रिय स्पर्धा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

जगभरातील 200 देशात सायकलिंग या क्रीडा प्रकाराचे चाहते आहेत, त्यांच्यापर्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याची संस्कृती, परंपरा या सर्व गोष्टी पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच या स्पर्धेतून पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होण्याची संधी निर्माण होणार आहे. एक आरोग्यदायी जीवनशैली स्विकारण्यास प्रोत्साहन देणारी अशी ही स्पर्धा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सीएफआयचे अध्यक्ष पंकज सिंह व इतर मान्यवर उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.