आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 भंडारा

शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने - दादा भुसेंची माहिती

नितीन देशपांडे   316   03-07-2025 22:41:06

Mumbai (मुंबई प्रतिनिधी)  

शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी कायमस्वरूपी भरतीएवजी कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार आहे.

आपल्या भागातील नवनवीन बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा व चॅनलला फॉलो करा 

https://chat.whatsapp.com/CpAIGQtMUxgHIkphDc5ULj

Please Follow 

https://whatsapp.com/channel/0029Vb9Qt92Gk1FpQ0gsYf1M

राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाईच नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. जे कर्मचारी आता सेवेत आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील. पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी भरती केली जाणार आहे अशी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत केली.

शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे. यु-डायस (UDISE) प्राणलीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले.

दादा भुसे यांनी राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे विधान परिषदेत काही काळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळांमध्ये शिपाईंची भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे, असा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. तसेच अनेक शाळामंध्ये मुलांपेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणून कायमस्‍वरुपी भरती झाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधकांनी यासंदर्भात दादा भुसे यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, अशी मागणी सभागृहात केली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.