मुंबई प्रतिनिधी (Yogesh Tikekar) नव्याने समाविष्ट आणि हडपसर- वाघोली अशी पुण्याच्या पूर्व भागातील गावांची एकत्रित महानगरपालिका निर्माण करण्याची मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधीद्वारे आज विधान परिषदेत केली आहे.
वाढत्या नागरिकरणामुळे या समाविष्ट गावांना सुविधा पुरवण्यात महानगर पालिकेची कसरत होत असून आर्थिक अडचणीही निर्माण होत आहेत. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील हडपसर-मांजरी-वाघोली आणि त्या लगतच्या गावांची एकत्रितपणे स्वतंत्र महानगर पालिका करण्याची मागणी आमदार टिळेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
अधिक माहिती देताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले की “पुणे शहराच्या हद्दीलगत असलेल्या ३२ गावांचा पुणे महापालिकेत समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका प्रशासनावरील ताणही प्रचंड वाढला आहे. पुणे शहराचा चोहोबाजूंनी होत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे शहराचे व्यवस्थापन करणे महापालिकेला अवघड होत आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविणे महापालिकेला अशक्य होत आहे. वाढलेली हद्द आणि अपुरी प्रशासकीय व्यवस्था यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण लक्षवेधीमुळे आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे सर्वच मंत्रिमंडळाचे बारीक लक्ष होते;
नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी देण्याचा मंत्री महोदयांचे आश्वासन
महानगरपालिकेवरील वाढता ताण आणि पूर्व पुण्यातील उपनगरांच्या समस्या सोडवण्यासाठी, मी आज हडपसर-मांजरी-वाघोलीसाठी स्वतंत्र महानगरपालिकेच्या निर्मितीची मागणी केली आहे. या भागाची लोकसंख्या आणि आर्थिक क्षमता पाहता, हा निर्णय न्यायसंगत आणि आवश्यक आहे. यावर सरकारने तातडीने विचार करावा अशी मागणी केली. परंतु, सध्या नव्या महानगरपालिकेचा कोणताही प्रस्तावित निर्णय नसल्याने नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांना लागेल तेवढा निधी देण्याचा मंत्री महोदयांनी आश्वासन दिले आहे.
योगेश टिळेकर
आमदार ,विधान परिषद