आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

महाराष्ट्राच्या प्रगतीत अर्बन बँकिंगचे मोठे योगदान!

शरद लाटे  40   30-06-2025 09:46:34

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नागपूरच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीबाबत गौरवोद्गार काढत उपस्थित सर्व मान्यवरांना संबोधित केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वर्धमान अर्बन बँकेची स्थापना आणि माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा प्रारंभ दोन्ही एकाच वर्षात झाले. या बँकेचे नाव ‘वर्धमान’ म्हणजेच 'वृद्धी' दर्शवणारे आहे – आणि ती समृद्ध आहे कारण यशस्वी, प्रतिष्ठित आणि आपल्या क्षेत्रात उत्कृष्टतेला गवसणी घालणाऱ्या व्यक्तींनी ती उभी केली आहे. या बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने समर्पित भावनेने काम करत या संस्थेला पुढे नेले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस याप्रसंगी म्हणाले. "कोविड काळ वगळता, या बँकेने सातत्याने 15% लाभांश वितरित केला आहे, ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक उल्लेखनीय कामगिरी आहे,” असे देखील यावेळी त्यांनी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, समाजाच्या प्रगतीसाठी आर्थिक संस्था या अत्यंत महत्त्वाच्या घटक आहेत. वर्धमानसारख्या सहकारी बँकांनी गरजू उद्योजकांना वेळेत आर्थिक मदत दिली आणि त्यांच्यामार्फत फक्त त्यांच्या व्यवसायांचा नव्हे, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचाही विकास झाला. गेली 25 वर्षे वर्धमान बँक प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि निष्ठेने बँकिंग मूल्यांचे संवर्धन करत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करत आहे. 2035 पर्यंत 9 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने भारताची तयारी सुरू आहे. 'या वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसारख्या संस्थांनीही दूरदर्शी आणि परिवर्तनशील विचारांची आवश्यकता ओळखली पाहिजे,' असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार सागर मेघे, पगारिया समूहाचे अध्यक्ष उज्ज्वल पगारिया, तसेच वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अनिल पारख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.