आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नाशिक

Pune shivsena वैशाली नागवडे व पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग याच भाजपाच्या पदाधिकाऱ्याने केला होता - रवींद्र धंगेकर

शिंदे राम   328   26-06-2025 22:05:09

पुणे  (ravindra dhangekar shivsena)

भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे याने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलीस अधिकारी महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र हा संपूर्ण प्रकार कसल्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. त्याचवेळी हेमंत रासने यांनी प्रमोद कोंढरे याला समज देणे आवश्यक होते. मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकर म्हणाले, प्रमोद कोंढरे नराधम या महिला भगिनीला ज्या पद्धतीने स्पर्श करत होता. हा सगळा निंदनीय प्रकार पुणेकरांनी पाहिला. हेमंत रासने त्या ठिकाणी होते. त्यावेळी त्यांनी कुठल्याही प्रकारचा जाब कोंढरेला विचारला नाही. परंतु ही महिला जेव्हा वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार करायला गेली. तेव्हा हेमंत रासने त्यांच्यावर दबाव आणत होते. आणि केस मागे घेण्यास सांगत होते. कुठल्याही दबावाला ती बळी पडली नाही. महिलेचं खरतर कौतुक करायला हवं. त्या महिलेने पोलिसांचा मानसन्मान वाढवला. पोलिसांना माझी विनंती आहे की, हेमंत रासने सारख्या आमदाराला सहआरोपी करावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घ्यावी. त्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो. पुण्यात भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते यांची वागणूक चांगली नाही. पूर्वीही यांच्याकडून असे प्रकार घडले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.

महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे त्याचे आम्हाला भान आहे. मात्र, पुण्यातील भाजपचा पदाधिकारी ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करीत असेल तर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुण्यात शिवसेना गप्प बसणार नाही. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याचा माज आम्ही उतरवू असे सांगून रवींद्र धंगेकर म्हणाले की, यापूर्वी देखील याच भाजपा पदाधिकारी असणाऱ्या प्रमोद कोंढरे याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली नागवडे यांचाही विनयभंग केला होता आणि त्याचा गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा शिवसेनेतर्फे आम्ही करू. हे प्रकरण दाबले जाणार नाही, याची ग्वाही आम्ही पुणेकरांना देतो. या स्त्रीलंपट प्रमोद कोंढरे सारख्या पदाधिकाऱ्याला, मित्रपक्ष भाजपने पक्षातून त्वरित काढून टाकावे अशी मागणी करून, याप्रसंगी कसब्याचे भाजपचे आमदार हेमेंत रासने उपस्थित होते त्यांनी या बाबतीतचे मौन सोडवे असे आव्हान धंगेकर यांनी केले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.