आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

राज्य सरकारच्या व विद्युत नियामक आयोगाच्या दूरदृष्टी निर्णयामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार :- शत्रुघ्न काटे

शरद लाटे  296   26-06-2025 18:38:07

पिंपरी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विजदर कमी होणार आहे. विशेष म्हणजे घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचे आदेश दिले आहेत.

याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष Shatrughna Kate शत्रुघ्न (बापू) काटे यांनी राज्य सरकार व विद्युत महामंडळाचे आभार मानले.

आमच्या प्रतिनिधीला ते म्हणाले की; या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य घटकाला दिलासा देणारी गोष्ट आहे यामध्ये राज्याचे लोकहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार व महायुती सुरुवातीपासूनच आग्रही होती अखेर काल आयोगाने निर्णय घेतला त्याबद्दल सरकार व आयोगाचे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले.

 नक्की काय आहे हा निर्णय? पाहूया सविस्तर….

राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणनं दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (Electricity Bill Discount Maharashtra) महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून घरगुती, औद्योगिक आणि व्यवसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10% तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात 26 टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार आहेत.

राज्यात 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरण्याचे प्रमाण 70% इतके आहे. त्यांच्यासाठी जुलैपासून 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. 100 पासून 500 युनिट पर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना एक जुलैपासून वाढीव दराने विजेचे बिल भरावे लागणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांना होणार आहे. म्हणजेच दररोज तुम्ही विजेची बचत केली आणि 100 युनिट पेक्षा वीज कमी वापरली गेली तर 10 टक्के दर कमी होतील.

आयोगाने दिलेल्या निर्णयातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी 10 टक्के अतिरिक्त सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन अशी आयोगाच्या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत.

दुसरीकडे राज्य सरकारने शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात HP पर्यंत पंप असलेल्या राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. वीज दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना 2.0 महत्वपूर्ण ठरत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.