आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

दुचाकींवरही द्यावा लागणार टोल, केंद्र सरकार आणणार नवा नियम!

शरद लाटे  27   26-06-2025 15:05:47

पुणे (wo-wheeler toll India 2025: )चारचाकी वाहनांसाठी वार्षिक पासचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केला. यामुळे चारचाकी वाहनचालकांना दिलासा मिळाला. दरम्यान या निर्णयाला महिनाही पूर्ण झाला नसताना दुचाकी स्वारांना मोठा धक्का दिलाय.

राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरही कर भरावा लागेल. हा नियम १५ जुलैपासून लागू होईल.

 

तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्या वेळी टोल कर वसूल केला जातो. असे असताना दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझामधून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल कर आकारला जात नाही. राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी किंवा त्यावरील वाहनांकडूनच टोल कर वसूल केला जातो.पण नवीन नियमानुसार दुचाकी वाहनांना FASTag द्वारे टोल भरावा लागेल. जो कोणी नियमाचे उल्लंघन करेल त्याला 2 हजार रुपये दंड भरावा लागेल.

 

देशात NHAI टोल किती ?

 

NHAI च्या टोल माहिती प्रणालीच्या नोंदीनुसार, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशात एकूण 1057 NHAI टोल आहेत. त्यापैकी सुमारे 78 टोल आंध्र प्रदेशातच आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 33३ टोल आहेत तर उत्तर प्रदेशात 123 टोल प्लाझा आहेत.

टोलमधून किती उत्पन्न मिळणार?

 

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये एकूण 55 हजार कोटी रुपयांच्या टोल महसुलापैकी खासगी कारचा वाटा फक्त 8 हजार कोटी रुपये होता. टोल प्लाझावरील वाहतुकीत खासगी गाड्यांचा वाटा 53% असतो पण महसूलात त्यांचा वाटा फक्त 21% असतो. शिवाय सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत खासगी वाहनांचा वाटा जवळजवळ 60% असतो. तर व्यावसायिक वाहने दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत धावतात, असे टोल व्यवहारांच्या विश्लेषणातून दिसून येते. पासची किंमत किती?या पासची किंमत दरमहा 340 रुपये आहे. जी वार्षिक 3000 रुपये होते. असे असले तरी लहान-मोठ्या वाहनांप्रमाणे वेगळी असू शकते. हे विशेषतः खासगी गैर-व्यावसायिक वाहनांसाठी असेल. यात जीप आणि व्हॅनचा समावेश आहे. हा पास सक्रिय झाल्यानंतर एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्यांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल) वैध असेल. वाहनचालक राष्ट्रीय महामार्ग अॅप आणि NHAI आणि MoRTH च्या अधिकृत पोर्टलवरील एका विशेष विभागाद्वारे त्यांचा पास अॅक्टीव्ह आणि अपडेट करू शकतील.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.