आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पुणे शहर

Pune पुण्यात भाजपा पदाधिकाऱ्याचा कारनामा चक्क; महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन

शरद लाटे  27   25-06-2025 09:47:22

पुणे-: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेने पुणे शहरातच नव्हे तर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिस दलातील महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी आता भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद विठ्ठल कोंढरे असं या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आता फरासखाना पोलिस ठाण्यात कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार सोमवारी दुपारी १.३० वाजता पुण्यातील कसबा पोलिस चौकीजवळ घडला. पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौरा होता. या निमित्त स्थानिक आमदारांसह भाजप चे अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी काही जणं केंद्रीय मंत्री यांची वाट बघत असताना त्याठिकाणी असलेल्या एका चहा च्या दुकानात चहा पिण्यासाठी थांबले होते. त्या पोलिसांचा बंदोबस्त असल्या कारणाने संबंधित महिला पोलिस अधिकारी उपस्थितीत होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या कोंढरे यांनी त्यांना धक्का दिला आणि तसेच त्यांच्याशी गैरवर्तन केले. ही सर्व घटना सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे.

दुसऱ्या बाजूला, कोंढरे यांनी त्यांवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. याच घटनेबद्दल कोंढरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात संपूर्ण घटनेचे वर्णन करून संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला "माझा कुठला ही प्रकाराचा धक्का" लागला नाही असं म्हटलं आहे. कोंढरे यांच्याकडे सध्या भाजपच्या पुणे शहराच्या महामंत्री पदाची जबाबदारी आहे. "सत्य परेशान हो सकता है पराजित नही" अशी प्रतिक्रिया कोंढरे यांनी व्हॉट्सॲप च्या माध्यमातून दिली आहे. कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.