आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 सिंधुदुर्ग

Ajit Pawar NCP: अजित पवार गटात मोठी नाराजी, बड्या नेत्यांना 'वाळीत' टाकलं, चर्चांना उधाण

शरद लाटे  153   25-06-2025 08:43:34

पुणे- (Ncp news) 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एकीकडे शिंदे गटाच्या प्रचंड नाराजीचा सामना करावा लागत असताना आता त्यांच्या स्वत:च्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातही असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही दोन शहरं अजित पवार (Ajit Pawar) यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी संख्या असल्याने येथील राजकारणावर कायमच अजित पवार यांची पकड राहिली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील (Pune News) अनेक बडे नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदारांचा समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार, जुन्नरचे अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे पक्षात प्रचंड नाराज आहेत. पक्षातील कोणत्याच बैठकीत आपल्याला बोलवले जात नाही. तसेच कोणतीच जबाबदारी पक्षातून दिली जात नाही, अशी खंत या माजी आमदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पक्षात नवीन येणाऱ्या लोकांचा मानसन्मान केला जातो, पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का? असा सवाल या आमदारांकडून खासगीत उपस्थित केला जात आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.